वामनाचे वैराग्य, बळीराजाची भक्ती आणि समुद्रमंथनातून जीवनमूल्ये

    दिनांक :28-May-2026
Total Views |
बालयोगी विष्णूप्रसाद अरोरा महाराजांचे प्रतिपादन

यवतमाळ, 
Balayogi Vishnuprakash Arora Maharaj पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी महिला मंडळातर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथेमध्ये तिसèया दिवशी बालयोगी विष्णूप्रसाद अरोरा महाराजांनी प्रल्हाद चरित्र, वामनअवतार आणि समुद्रमंथनाच्या दिव्य प्रसंगांमधून धर्म, वैराग्य, भक्ती, सत्य आणि आत्मचिंतन यांचे अत्यंत प्रभावी निरूपण केले. महाराजांच्या ओजस्वी वाणीतून साकारलेल्या कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. कथेच्या प्रारंभी भक्त प्रल्हादाच्या अखंड श्रद्धेचा उल्लेख करत महाराजांनी सांगितले की, संकटे कितीही मोठी असली तरी ज्याच्या मनात ईश्वरभक्ती आणि सत्य असते, त्याला कोणतीही शक्ती डगमगवू शकत नाही. भक्तीमध्ये निष्ठा आणि धर्मामध्ये सत्यता असेल तर ईश्वरकृपा निश्चित प्राप्त होते, असा संदेश त्यांनी दिला.
 
 
y28May-Balyogi
 
त्यानंतर वामन अवताराचे अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण वर्णन करताना महाराजांनी भगवान विष्णूंनी वामनरूप धारण करून राजा बळीच्या यज्ञस्थळी आगमन केल्याचा प्रसंग उलगडला. केवळ तीन पावलांची भूमी मागणाèया वामनांनी विराट रूप धारण करून संपूर्ण सृष्टी व्यापली आणि राजा बळीचा अहंकार दूर केला. मात्र या कथेमध्ये बळीराजाच्या वैराग्य, त्याग आणि भक्तीचे महानत्वही त्यांनी अधोरेखित केले. गुरु शुक्राचार्यांनी विरोध करूनही बळीराजाने आपल्या वचनाचा त्याग केला नाही. सत्य, दानशीलता आणि समर्पण यांवर ठाम राहून त्यांनी आपल्या भक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध केले.
 
 
Balayogi Vishnuprakash Arora Maharaj  समुद्रमंथनाच्या प्रसंगाचे विवेचन करताना महाराजांनी समुद्रमंथनाचा खरा अर्थ विचारमंथन असा स्पष्ट केला. जसे समुद्र मंथनातून अमृत आणि विष दोन्ही बाहेर आले, तसेच मानवी जीवनामध्येही सतत चांगले आणि वाईट विचारांचे मंथन सुरू असते. मनातील विचार शुद्ध आणि सकारात्मक असतील तर जीवनात सद्गुण, शांतता आणि आत्मिक समाधान प्राप्त होते. आचरणातून धर्म जोपासला गेला पाहिजे आणि विचारांमध्ये सात्त्विकता असली पाहिजे, असे सांगत महाराजांनी आत्मचिंतन आणि आत्मशुद्धीचे महत्त्व भाविकांना पटवून दिले. महाराजांच्या रसाळ कथावाचनाने, प्रभावी उदाहरणांनी आणि अध्यात्मिक संदेशांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. भक्तीमय वातावरण, नामस्मरण आणि आध्यात्मिक विचारांनी संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.