संग्रामपूर( ता.प्र.),
unauthorized cotton seeds अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील काही इसम अनधिकृत HTBT कापूस बियाणे घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाचे अधिका-यांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनातील अनधिकृत HTBT कापूस बियाण्याचे पाकीट व वाहनासह एकूण ८ लाख ५८ हजार रु.चा मुद्देमाल हस्तगत करून तामगाव पोलिसात तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की आज दि. २६ / मे/२०२६ रोजी कृषी विभागाच्या जिल्हा पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यात काही ईसम एका वाहनातून भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत HTBT कापूस बियाणाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते. त्यावरून कृषी विभागाने तातडीने संबंधित तालुक्यात व बाजूच्या दोन तालुक्याच्या रस्त्यावर बियाणे निरीक्षकांनी वाहन थांबून तपासणी केली असता एका इको गाडी वाहनात मुद्देमाल आढळून आला.त्यामध्ये DHOOM-2 चे 99 ,20 ,20 ,पिंग गार्ड4 जी 269 पाकिटे व पी एल चॅम्पियन 100 नावाचे प्रतिबंधित कापूस बियाण्याचे 458 पॅकेट त्याची एकूण किंमत ४ लाख १८ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेले ईको गाडी वाहन किंमत ४ लाख रुपये असा एकूण ८ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर घटनेची फिर्याद पं.स.संग्रामपूरचे कृषी अधिकारी रविकिरण नावकार यांनी तामगाव पो.स्टे.स्ला फिर्याद दिल्यावरून बियाणे कायदा 1966, 1968, 1986, 2009 व अत्याअशक वस्तू अधिनियम 1955 चे भा.न्या.सं 2023 नुसार गुलाबराव ठाकरे रा. सांगोळा ता. पातुर जि. अकोला, शंकर दांदळे रा. सांगोळा ता. पातुर जि.अकोला फरार झालेले विनोद पाटील उर्फ विनोद वाघमारे रा.शिर्ला अंधारे जि. अकोला यांचे गुन्हा दाखल केला.unauthorized cotton seedsही कारवाई म.रा. संचालक (निविष्ठा गुण नियंत्रण) सुनील बोरकर ,अमरावती विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख बुलढाणा, जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे, तंत्र अधिकारी गुण नियंत्रण अमरावती चे नितीन लोखंडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शकाखाली जि. प. बुलढाण्याचे कृषी विकास अधिकारी पुरुषोत्तम अंगाईत, जि.प. यवतमाळचे मोहीम अधिकारी प्रमोद गायके, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश सावंत, संग्रामपूर पं स.चे कृषी अधिकारी रवीकरण नाव कार, गुण नियंत्रण कृषी अधिकारी कु.रोहिणी बढे, सहाय्यक कृषी अधिकारी रवींद्र जाधव (जळगाव जामोद), कृषी अधिकारी गुण नियंत्रण अधिकारी अजिंक्य हटकर कृषी अधिकारी व नियंत्रक जाणू पवार ,कृषी विभागाचे कनिष्ठ लिपिक धनंजय देवकर यांनी कारवाई केली आहे.