उष्माघाताने ५३ वर्षीय इसमाचा मृत्यू

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नांदगाव खंडेश्वर, 
Death due to heatstroke नांदगाव खंडेश्वर शहरात एक अत्यंत वेदनादायी व मन सून्न करणारी घटना घडली. अति उष्णतेमुळे स्थानिक बस स्टॉप परिसरात रिक्षाने पाणी वाहणारे असंघटित ५३ वर्षीय कामगार राजेंद्र उकंडराव श्यामसुंदर यांचा उपचारादरम्यान २७ मे रोजी मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की, दिवसभर कडाक्याच्या उन्हात स्थानिक बस स्टॉप परिसरातील हॉटेल व्यवसायिकांना पाणी पुरविण्याचे नित्य नियमाचे काम करीत होते.
 
 
heat dks
 
Death due to heatstroke  सर्व काम आटोटून रात्री आठ वाजता जेवण केल्यानंतर फिरत असताना अचानक चक्कर आल्याने जागीच कोसळले. शेजार्‍यांनी व परिवारातील सदस्यांनी तात्काळ दवाखान्यात हलविले. बेशुद्ध अवस्थेत अमरावती येथे नेण्यात आले. पीडीएमसीमध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. अति उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. स्थानिक मोक्षधाममध्ये अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीला समाज बांधव, आप्त परिवार, सामाजिक कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुले शिक्षण घेत आहे. घरचा कर्ता पुरुष गेल्याने मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात आली.