‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका

सात दिवसांत 25.85 कोटींचा टप्पा पार

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई
Deool Band 2 मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित आणि प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा ‘देऊळ बंद 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात उल्लेखनीय कमाई करत निर्माते आणि वितरकांना दिलासा दिला आहे. 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सिनेमागृहांमध्ये गर्दी कायम आहे.
 

Deool Band 2  
पहिल्या दिवसापासूनच ‘देऊळ बंद 2’ने स्थिर आणि वाढता कमाईचा आलेख राखला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.45 कोटी रुपयांची नेट कमाई केली. दुसऱ्या दिवशी कमाईत किंचित वाढ होत 2.55 कोटी रुपये मिळाले. विकेंडमध्ये मात्र चित्रपटाने जोरदार उसळी घेत तिसऱ्या दिवशी 4.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चौथ्या दिवशीही ही गती कायम राहत 5.90 कोटी रुपयांची कमाई नोंदवली गेली.सप्ताहाच्या मध्यात चित्रपटाच्या कमाईत काही प्रमाणात स्थिरता दिसून आली. पाचव्या दिवशी 3.40 कोटी रुपये, तर सहाव्या दिवशी 3.35 कोटी रुपये इतकी कमाई झाली. सातव्या दिवशीही चित्रपटाने 3.35 कोटी रुपयांचा टप्पा पार करत Deool Band 2 आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. सात दिवसांच्या कालावधीत ‘देऊळ बंद 2’ने देशभरात एकूण 25.85 कोटी रुपयांचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.चित्रपटाला मिळालेल्या या यशामागे कौटुंबिक प्रेक्षकांचा मोठा वाटा असल्याचे निरीक्षण चित्रपट व्यापार विश्लेषकांकडून नोंदवले जात आहे. सातत्यपूर्ण कमाई आणि स्थिर प्रतिसाद पाहता ‘देऊळ बंद 2’चा बॉक्स ऑफिस प्रवास आगामी दिवसांतही सकारात्मक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.