शिरपूर येथील देशमुख यांची शेतकरी पुरस्कारासाठी निवड

    दिनांक :28-May-2026
Total Views |
शिरपूर जैन,
deshmukh from shirpur येथील प्रगतशील शेतकरी संजय देशमुख यांची स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय गौरव पुरस्कार, श्री संत सावता माळी कृषी पुरस्कार राष्ट्रीय संत प्रेरणा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली असून, सदर दोन्ही पुरस्काराचे वितरण ५ जुलै रोजी संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर व विद्यानिकेतन सामाजिक शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य १४ जून रोजी वाई जि. सातारा येथे होणार आहे.
 

deshmukh from shirpur 
 
 
येथील प्रगतशील कास्तकार हळद उत्पादक व इतर पिकांच्या उत्पादनाबद्दल यश प्राप्त केले म्हणून तसेच यांची सह्याद्री चॅनल वरील शिमला मिरची यशोगाथा, पपई यशोगाथा व हळद पिकावरील नियोजन अग्रलेख यांची विशेषत दखल घेत वेगवेगळ्या दोन ठिकाणी होणार्‍या शेतकरी पुरस्काराबाबत यांची निवड केली असून, ५ जुलै रोजी राज्यस्तरीय सन्मान २०२६ साठी हा गौरव पुरस्कार सरपंच सेवा संघाचे समर्थकबाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे तर दुसरा पुरस्कार श्री संत सावता माळी कृषी पुरस्कार अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे, यासाठी संजय देशमुख यांची निवड करण्यात आली.