रानडुकराचे हल्ल्यात शेतकरी इसम गंभीर जखमी

    दिनांक :28-May-2026
Total Views |
शेगाव,
injured in wild boar attack एका ४८ वर्षीय शेतकरी इसमावर रानडुकराने अचानक हल्ला चढवत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील मानेगाव नदी पात्रात ता २६ मे रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली.
 
 
injured in wild boar attack
 
मानेगाव तालुका शेगाव येथील शेतकरी नारायण एकनाथ ढगे वय ४८ वर्ष हे त्यांच्या म्हशी पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले होते.त्याठिकाणी दडून बसलेल्या रानडुकराने त्यांच्यावर अचानक जोरदार हल्ला केला. यात त्यांचे डाव्या पायाचे मांडीला गंभीर जखमी केले.त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचार केल्यावर डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहून पुढील उपचार साठी अकोला येथे रेफर केले.injured in wild boar attackशासकीय रुग्णालयात त्यांचेवर पुढील उपचार करण्यात आले. त्यांचे पायाला गंभीर दुखापत जखम असल्याने एकूण३३ टाके लागले आहेत.याबाबत रुग्णालय मार्फत शेगाव पोलिसांना कळवण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग खामगाव यांचे कडे तक्रार करण्यात आली आहे.