cवर भर द्यावा- माजी कृषीमंत्री बिसेन

- मजीतपूर येथे आंबा महोत्सवाचे आयोजन

    दिनांक :28-May-2026
Total Views |
गोंदिया,
agriculture minister bisen शेतकर्‍यांनी पारंपारिक शेतीला बगल देत आता फळपिकाकडे वळणे आवश्यक आहे. आंबा पिकासाठी अनुकूल हवामान जिल्ह्यात असल्याने शेतकर्‍यांनी आंबा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकर्‍यांनी आंबा पिकाचे उत्पादन घेत त्याच्या निर्यातीवर भर दिल्यास शेतकर्‍याचे जीवनमान निश्चितच बदलेल, असा विश्वास मध्यप्रदेश शासनाचे माजी कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी केले.
 
 
agriculture minister bisen
 
 
गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र ठाकूर तसेच ओम ऍग्रोच्या वतीने आंबा महोत्सवाचे आयोजन 27 मे रोजी करण्यात आले होते. यावेळी आंबा उत्पादक शेतकरी व उपस्थित इतर शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. आंबा महोत्सवात 111 प्रजातीचे आंबे शेतकरी व मान्यवराकरीता बघण्याकरीता ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कृषी अधिक्षक निलेश कानवडे यांच्या हस्ते करण्यात आले.agriculture minister bisen यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी महेंद्र ठोकडे, प्रगतशील शेतकरी गजेंद्र रहांगडाले, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या प्रेमलता दीदी, प्रगतिशील शेतकरी भालचंद्र ठाकूर, बालाघाट जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेखा बीसेन, प्रगतिशील महिला शेतकरी अंजली ठाकूर, माजी जि. प. सदस्य नरेंद्र तुरकर, पप्पु भादुपोते, पवार प्रगतिशिल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र ठाकूर यांनी तर आभार अंजली ठाकूर यांनी मानले.