अमरावतीत होणार शासकीय आयुर्वेद रुग्णालय

आ. सुलभा खोडके यांच्या प्रयत्नास यश रहाटगांवची जागा मंजूर

    दिनांक :28-May-2026
Total Views |
अमरावती, 
ayurveda hospital अमरावती जिल्ह्यातील गरजू व सर्वसामान्य घटकातील रुग्णांना आरोग्य संजीवनी मिळावी व आरोग्य सेवांना अधिक बळकटी मिळावी म्हणून आ. सुलभा खोडके यांची सातत्यपूर्ण प्रयत्नांची मालिका सुरू आहे. शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अत्याधुनिक प्रगत व सक्षम अशी आरोग्य यंत्रणा उभी झाली असतांना आता त्यामध्ये नवीन जिल्हा शासकीय आयुष रुग्णालयाची भर पडणार आहे. सुलभा खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अमरावती येथे ५० खाटांच्या जिल्हास्तरीय आयुष रुग्णालयासाठी रहाटगांव येथील जागा मंजूर करण्यात आली आहे.
 


अमरावतीत होणार शासकीय आयुर्वेद रुग्णालय 
 
केंद्र शासनामार्फत आयुष मंत्रालय कक्ष स्थापन करण्यात आले असून त्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील ग्रामीण भागात आयुर्वेदिक दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. परंतु जिल्हास्तरावर आयुष रुग्णालयाची इमारत उपलब्ध नाही. त्यामुळे गरीब घटकांबरोबरच ग्रामीण व दुर्गम-अतिदुर्गम भागातील लोकांना आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतून चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हास्तरावर आयुष रुग्णालयाची नितांत गरज असल्याने अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू केला.
 
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हास्तरावर आयुष रुग्णालयाच्या इमारतीकरिता साधारणतः ३ ते ४ एकर जागा असणे आवश्यक आहे.ayurveda hospital जागा निश्चित न झाल्याने अमरावती येथे आयुष रुग्णालय स्थापन करण्याला घेऊन विलंब लागत होता. अशातच आ. सुलभा खोडके यांनी जागेसंदर्भात शासन -प्रशासन स्तरावर पाठपुरावा चालू केला असता रहाटगांव येथे जागा उपलब्ध असल्याने ती जागा जिल्हास्तर आयुष रुग्णालयकरिता निश्चित करण्याबाबत सूचना केली. महसूल विभागाच्या सर्व नियम व अटींनुसार जलद कामकाज करण्यात आल्याने आता अमरावती येथे ५० खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयासाठी रहाटगांव येथे १.२१ हेक्टर जागा मंजूर करण्यात आली आहे.