नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात भव्य आरोग्य शिबिर

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर,
Grand Health Camp देशाचे विकासपुरुष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा नरेंद्र नगर मंडळ, दक्षिण पश्चिम नागपूर व मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात नागरिकांची विविध तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये फिजिशियन कन्सल्टेशन, आरबीएस, बीपी, बीएमआय, उंची- वजन मोजमाप, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, यूरिक ॲसिड तपासणी, BMD, नेत्र तपासणी तसेच PFT यांसारख्या आरोग्य चाचण्यांचा समावेश होता. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घेतला.
 
Grand Health Camp
 
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयामार्फत विविध शासकीय योजनांसंदर्भात विशेष शिबिरही घेण्यात आले. यामध्ये आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, लाडकी बहीण योजना तक्रार निवारण, रेशन कार्ड ई-केवायसी, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, SIR, श्रावण बाळ योजना तसेच निराधार योजना यांसंदर्भात मार्गदर्शन व तक्रार निवारण करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन आयटी सेल अध्यक्ष रुपल दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. Grand Health Camp कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेविका विशाखाताई मोहोड यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला नगरसेविका विशाखाताई मोहोड, नगरसेवक रितेश गावंडे, नागपूर शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश शिंगारे, मंडळ अध्यक्षा अंजली देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय आघाडी उपाध्यक्ष पाठक तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: रूपात दोडके, संपर्क मित्र