मुल्लानपूर
IPL 19 व्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) क्वालिफायर 2 सामन्यात शुक्रवारी मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत. क्वालिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून 92 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्यामुळे गुजरात टायटन्सना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नाही. साखळी फेरीत नऊ विजयांसह दुसèया क्रमांकावर राहिल्यामुळे गुजरात संघाला आता अंतिम फेरीत पोहोचण्याची दुसरी संधी मिळाली आहे. त्यांच्या मार्गात आता राजस्थान रॉयल्स हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला संघ उभा आहे. राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 47 धावांचा निर्विवाद विजय मिळवून या बाद फेरीच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे.
IPL आयपीएल 2026 च्या हंगामातील साखळी फेरीत हे दोन्ही संघ दोनदा आमने-सामने आले होते आणि त्यातील प्रत्येकी एका सामन्यात त्यांनी विजय मिळविला होता. अहमदाबादमध्ये झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 धावांनी बाजी मारली होती, तर जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने 77 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले होते.
IPL या मैदानावर आतापर्यंत पाच सामने खेळले गेले असून, त्यातील बहुतांश सामने हे अत्यंत मोठ्या धावसंख्येचे ठरले आहेत. राजस्थान आणि गुजरात यांच्यातील एलिमिनेटर सामना याच मैदानावर खेळला गेला होता; त्यावेळी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने 243 धावांचा प्रचंड डोंगर उभारला होता. दोन्ही संघांमध्ये फटकेबाजी करणारे दिग्गज फलंदाज असल्यामुळे या सामन्यातही पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
IPL या क्वालिफायर 2 सामन्यातील विजयी संघ रविवारी नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अहमदाबाद येथे होणाèया अंतिम सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळेल.