फिल्मी स्टाईल पाठलाग करून आंतरराज्यीय घरफोडी टोळी जेरबंद

    दिनांक :28-May-2026
Total Views |
वडनेर पोलिसांची कारवाई
 
हिंगणघाट, 
House Burglary Case तालुयातील वडनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दारोडा टोल नायावर पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई करीत आंतरराज्यीय घरफोडी करणार्‍या तीन सराईतांना शिताफीने अटक केली. जयचंद (रा. पूर्व दिल्ली), प्रेम खत्री (रा. नागपूर) आणि सतेंद्र गुप्ता (रा. भिलगाव, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत. तेलंगणातील-आदिलाबाद येथे घरफोडी करून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याची माहिती आदिलाबाद पोलिसांनी वर्धा पोलिसांना दिल्यानंतर वडनेर पोलिसांनी टोल नायावर नाकाबंदी केली होती. संशयित कार टोल नायावर पोहोचताच पोलिसांनी ती अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी गाडी भरधाव रिव्हर्स घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवत वाहनाला घेराव घालत तीनही आरोपींना ताब्यात घेतले. या फिल्मी स्टाईल कारवाईमुळे काही काळ टोल नाका परिसरात एकच खळबळ उडाली होती.
 
 
House Burglary
 
तेलंगणातील-आदिलाबाद वन टाऊन पोलिस स्टेशन हद्दीतील शांतिनगर परिसरात २३ मे रोजी एका टाळेबंद घरात चोरीची घटना घडली होती. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. तपासादरम्यान आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नंबर प्लेट तसेच बनावट फास्टॅगचा वापर करत असल्याचे उघड झाले. आरोपींनी आदिलाबाद, कामारेड्डी, वरंगल परिसरात सलग घरफोड्या केल्याचेही समोर आले आहे. अनेक गुन्हे केल्यानंतर ते वडनेरमार्गे नागपूरकडे पसार होत असताना सोमवारी रात्री वडनेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी प्रेम खत्री या सराईत गुन्हेगाराचे या टोल नायानजीकच्या दारोडा येथे नातेवाईक राहत असल्याची माहिती मिळाली आहे. तपासात हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर खून, दरोडा, चेन स्नॅचिंग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे ४६ लाख ४६ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोकड, मोबाईल फोन आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले असून चोरीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.
 
 
House Burglary Case ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग‘वाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक भारत वर्मा, समीर कामडी, प्रशांत भाईमारे, संदीप बदकी यांनी केली. कारवाईनंतर तिन्ही आरोपींना मुद्देमालासह आदिलाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.