सीमा शांततेवर भारत-चीन एकमत; बीजिंगमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा

    दिनांक :28-May-2026
Total Views |
बीजिंग,
Significant Talks in Beijing भारत आणि चीनमधील सीमा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन (WMCC) ची 35 वी बैठक आज बीजिंगमध्ये पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सीमा व्यवस्थापन, शांतता आणि स्थिरता यावर सविस्तर चर्चा केली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव (पूर्व आशिया) सुजित घोष यांनी केले, तर चिनी बाजूचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील सीमा आणि सागरी व्यवहार विभागाचे महासंचालक होउ यानकी यांनी केले. दोन्ही बाजूंमध्ये झालेली चर्चा रचनात्मक, सकारात्मक आणि भविष्यवेधी असल्याचे सांगण्यात आले.
 
Significant Talks in Beijing
 
बैठकीत भारत-चीन सीमावर्ती भागातील सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सीमाभागात शांतता आणि स्थिरता राखण्यात झालेल्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. यामुळे द्विपक्षीय संबंध सामान्य करण्याच्या प्रक्रियेला गती मिळत असल्याचेही मान्य करण्यात आले. Significant Talks in Beijing चर्चेदरम्यान सीमांकन, सीमा व्यवस्थापन, परस्पर समन्वय यंत्रणा मजबूत करणे तसेच सीमापार सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. सीमापार नद्यांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ स्तरावरील यंत्रणेची पुढील बैठक लवकरात लवकर घेण्याची गरज भारतीय बाजूने अधोरेखित करण्यात आली.
 
दोन्ही देशांनी राजनैतिक आणि लष्करी स्तरावर नियमित संवाद व संपर्क कायम ठेवण्यास सहमती दर्शवली असून आगामी विशेष प्रतिनिधी (SR) चर्चेसाठी ठोस तयारी करण्यावरही एकमत झाले आहे. Significant Talks in Beijing बैठकीदरम्यान भारतीय शिष्टमंडळाने चीनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्याबाबत विचारविनिमय केला.