कबड्डी असोसिएशन विदर्भ संघाची जूनमध्ये निवडणूक

    दिनांक :28-May-2026
Total Views |
वर्धा,
kabaddi association vidarbha team स्थानिक नगर परिषद कार्यालयात कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूरचे सचिव प्रदीपसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक घेण्याचे ठरले. यावेळी सर्व जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
 

कबड्डी असोसिएशन  
 
 
१४ जून रोजी कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर संघटनेचे कार्यालय, ब्लॉक नं. २८, वर्धा येथे निवडणूक घेण्याचे ठरविण्यात आले. या निवडणुकीत ज्याला सहभागी व्हायचे आहे त्यांनी १० जून रोजी दुपारी २ वाजता संघटनेचे सचिव प्रदीपसिंह ठाकूर यांच्याशी संपर्क साधावा.kabaddi association vidarbha team सभेला गणेश चौकसे, अभय सिंगारे, प्रफुल्ल देशमुख, वसंत देवटकले, सतीश इखार, विजय मोटघरे, शिरीष काळे, विजय येनुरकर, सुभाष तायडे, विजय खोकले, गोपाल राऊत, नितीन सराफ, सतीश टेंगरे, राम बहुरूपी आदी उपस्थित होते.