लसनपूर गोशाळेत गोसेवा अन् रुद्राभिषेक
वर्धा,
Maheshwari Samaj Yatra अधिकमासात चांदी आणि तांब्याचे भांडे दान आणि देवदर्शनाला अधिक महत्त्व आहे. गेल्या १० दिवसात ताब्यांच्या भांड्याचे दर चांगलेच वधारले आहेत. दरम्यान, अधिक महिन्यानिमित्त येथील माहेश्वरी मंडळातर्फे धार्मिक यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. साकुर्ली येथील जागृत भवानी माता मंदिरात प्रवचन आणि लसनपूर येथील गोशाळेत गोसेवा करून लघुरुद्र केला. लसनपूर येथील हरिओम बाबा मंदिरात शेकडो गायी आहेत. त्यांनी ठिकाणी गायींची सेवा करून पुण्य कमावले. गायींसाठी मोसमी भाज्या, धान्य, सुका मेवा आणि हिरवा चारा आदी ५६ विशेष नैवेद्य (छपन्न भोग) लावण्यात आले.
Maheshwari Samaj Yatra पुरुषोत्तम महिना म्हणजे अधिक महिना श्रीकृष्णाला प्रिय असल्याचे मानले जाते. धर्मग‘ंथांमध्ये याला ’मालमास’ नव्हे तर ’अधिक मास’ किंवा ’पुरुषोत्तम मास’ म्हटले आहे. या महिन्यात केलेले दान, नामजप, तपश्चर्या आणि गोसेवा यांचे फळ अमर्याद मिळते. गोमाता ही राष्ट्रीय विकासाचा पाया आहे. दूध, शेण आणि गोमूत्र शेतीसाठी सेंद्रिय खत पुरवतात, तर पंचगव्य आयुर्वेदाला समृद्ध करते. गोपालन ग‘ामीण अर्थव्यवस्थेला बळकट करते आणि पर्यावरणाचा समतोल राखते. त्यामुळे, गोसेवा हे केवळ एक धार्मिक कार्य नसून एक राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. लसनपूर गोशाळा संकुलातील विशाल महादेव मंदिरात भक्तांनी रुद्राभिषेक केला. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व अधिकार्यांनी विशेष सहकार्य केले.
आजपासून प्रवचन
माहेश्वरी समाजाच्या वतीने अधिकमासानिमित्त वंशोत्पत्ती दिवस श्री महेश नवमी उत्सवानिमित्त तीन दिवसीय रामकथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. माहेश्वरी भवन येथे श्याम नारायण महाराज चौबे हे मार्गदर्शन करणार आहेत.