युद्धाचा भडका अन स्वयंपाकघराला फटका

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
edible oil prices अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा फटका आता भारतीयांच्या दैनंदिन जीवनालाही बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे केवळ इंधनच नव्हे, तर खाद्यतेल आणि किराणा वस्तूंच्याही किमती झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांत खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण निर्माण झाला आहे.
 

युद्धाचा भडका अन 
 
 
बाजारातील आकडेवारीनुसार, मागील चार महिन्यांत रिफाइंड तेल आणि मोहरीच्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही नामांकित ब्रँडचे खाद्यतेल आता पॅकच्या आकारानुसार आणि दर्जानुसार प्रतिलिटर ११० रुपयांपासून तब्बल २०७ रुपयांपर्यंत विकले जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी ही आणखी एक मोठी चिंता ठरत आहे.
 
महागाईचा परिणाम केवळ स्वयंपाकघरापुरता मर्यादित राहिलेला नाही. खाद्यतेलाचा वापर बिस्किटे, स्नॅक्स, बेकरी पदार्थ, रेडी-टू-ईट खाद्यपदार्थ, फ्रोझन फूड्स आणि इतर अनेक एफएमसीजी उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढल्याने कंपन्या आता हळूहळू ग्राहकांवर अतिरिक्त भार टाकू लागल्या आहेत. परिणामी दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत.
 
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक भू-राजकीय संघर्षामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे उत्पादन आणि वाहतूक खर्च वाढत आहे. त्याचबरोबर प्लास्टिक, पॅकेजिंग साहित्य, लॅमिनेशन आणि कागद यांसारख्या घटकांचाही खर्च वाढल्याने एफएमसीजी कंपन्यांवरील आर्थिक दबाव अधिक वाढला आहे.
मोदी नॅचरल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अक्षय मोदी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, जागतिक तणावाचा प्रभाव अपेक्षेपेक्षा अधिक व्यापक आहे.edible oil prices कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने केवळ इंधनच महाग होत नाही, तर उत्पादनाशी संबंधित प्रत्येक घटकाचा खर्च वाढतो. याचा थेट परिणाम अखेरीस ग्राहकांच्या खिशावर होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वाढत्या महागाईमुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडू लागले असून आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.