मुल्लानपूर
Vaibhav Suryavanshi आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांची धडाकेबाज खेळी करणाèया किशोरवयीन वैभव सूर्यवंशीची क्रिकेट विश्वाने भरभरून प्रशंसा केली. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 15 वर्षी डावखुरा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ‘अप्रतिम बॅट स्विंग‘ची विशेष प्रशंसा केली.
Vaibhav Suryavanshi सूर्यवंशीने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षट्कार (59) मारण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. आता सूर्यवंशीच्या नावावर या हंगामात एकूण 65 षट्कार जमा झाले आहेत.
वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे. पायांच्या दिशेने येणाèया चेंडूंसाठी जागा निर्माण करण्याकरिता तो आपला पुढचा पाय सुंदरपणे बाजूला करतो. या मोकळेपणामुळेच त्याला आपल्या शैलीनुसार खेळणे शक्य होते. ती खेळी म्हणजे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हती, असे सचिन तेंडुलकरने म्हटले. ‘बॉस बेबीने युनिव्हर्सल बॉसचा विक्रम मोडला. सूर्यवंशीची खेळी अविश्वसनीय आहे, असे अनेक विश्वचषक विजेत्या युवराज सिंगने म्हटले.\
Vaibhav Suryavanshi सूर्यवंशीसारखे क्रिकेटपटू हेच सिद्ध करतात की भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे, असे माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने म्हटले. सूर्यवंशीच्या फटक्यांची गुणवत्ता ‘दुर्मिळ‘ आहे, असे वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशपने म्हटले. आपण एक चमत्कार पाहत आहोत, आपण एक भविष्यातील स्टार पाहत आहोत, असे भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला.
Vaibhav Suryavanshi सूर्यवंशीच्या या अद्भूत कामगिरीने भारावून गेलो, असे इंग्लंडचा महान फलंदाज केविन पीटरसन म्हणाला. वैभव सूर्यवंशीचे हात अत्यंत चपळ आहेत आणि सध्या तो पूर्णपणे निर्भीड होऊन खेळत आहे. त्याच्या शरीरात भीतीचा लवलेशही नाही, असे दक्षिण आफ्रिकन खेळाडू कॅगिसो रबाडा म्हणाला.
Vaibhav Suryavanshi सूर्यवंशी जगातील सर्वोत्तम टी-20 सलामीवीर आहे. भारताने त्याची नक्कीच निवड केली पाहिजे, असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने म्हटले.