मेटाचा 'धमाका' सोशल मीडिया वापरावर ‘चार्ज’

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई
Meta paid subscription सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या जगभरातील अब्जावधी युजर्ससाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मालकी असलेल्या मेटा कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मसाठी पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या ‘प्लस व्हर्जन’मुळे प्रीमियम फीचर्स वापरणाऱ्या युजर्सना आता दरमहा शुल्क भरावे लागणार असून, सोशल मीडिया क्षेत्रात यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.
 

Meta paid subscription  
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने काही काळापूर्वी सशुल्क सेवा सुरू केल्यानंतर त्याच्या महसुलात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याच धर्तीवर आता मेटानेही आपल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी प्रीमियम सेवा आणण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या निर्णयाचा परिणाम भारतासह जगभरातील कोट्यवधी युजर्सवर होणार आहे.
मेटाच्या नव्या प्लस व्हर्जनमध्ये युजर्सना काही विशेष सुविधा आणि प्रगत टूल्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये अधिक कस्टमायझेशन पर्याय, एक्सक्लुझिव्ह फीचर्स आणि काही प्रगत सेवा समाविष्ट असतील. आतापर्यंत मोफत उपलब्ध असलेली काही फीचर्स भविष्यात केवळ पेड सबस्क्राइबर्ससाठीच मर्यादित ठेवली जाऊ शकतात, अशीही माहिती समोर येत आहे.
कंपनीने जागतिक Meta paid subscription  स्तरावर या प्रीमियम सेवांसाठी संभाव्य मासिक शुल्काची माहिती दिली आहे. त्यानुसार, इंस्टाग्राम प्लस आणि फेसबुक प्लससाठी सुमारे ३८७ रुपये, तर व्हॉट्सॲप प्लससाठी जवळपास २९० रुपये दरमहा आकारले जाऊ शकतात. मात्र, भारतीय युजर्ससाठी नेमकी किंमत किती असेल, याबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.दरम्यान, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मोफत सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अधिक प्रगत फीचर्स आणि अतिरिक्त सुविधा वापरण्याची इच्छा असलेल्या युजर्सना आता त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मेटाच्या या निर्णयामुळे सोशल मीडिया कंपन्यांच्या व्यावसायिक धोरणांमध्ये मोठा बदल होत असल्याची चर्चा तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.