प्राध्यापक भरतीला आचारसंहितेचे ग्रहण

प्रक्रिया थंडावली

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर
Professor Recruitment विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्राध्यापकांची भरती प्रक्रियाही थंडावली असून, आचारसंहिता संपल्यानंतरच प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
 
Professor Recruitment 
Professor Recruitment राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी 5,012 रिक्त पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेळोवेळीच्या निर्देशांची पूर्तता करण्यासाठी ही भरती आवश्यक होती. पदभरती करताना विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना बिनचूक आरक्षण धोरण राबवता यावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेत एकदिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील उपकुलसचिव आणि सहायक कुलसचिव (मागास वर्ग कक्ष) यांनी सहभाग घेतला.
Professor Recruitment एनईपी अंमलबजावणीमुळे भरती गरजेची
एनईपीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व यूजीसीने पदभरतीबाबत दिलेले निर्देश विचारात घेता, महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक संवर्गातील रिक्त पदे भरणे आवश्यक होते. याच अनुषंगाने 5,012 पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. परंतु, आता आचारसंहिता लागू झाल्याने ती संपल्यानंतर नागपूर विद्यापीठात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.