नागपूर
Nagpur Legislature Building Plan हिवाळी अधिवेशनासाठी सध्याची विधिमंडळ इमारत अपुरी पडत असल्याने राज्य शासनाने विधानभवनाची विस्तारित नवीन इमारत प्रस्तावित केली आहे. मात्र, नवीन विधानभवन इमारतीच्या नकाशात त्रुटी आढळल्याने नगररचना विभागाने नकाशा दुरुस्तीसाठी परत पाठविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nagpur Legislature Building Plan नगररचना विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार, प्रस्तावित नकाशात एफएसआय, सेटबॅक, पार्किंग व अग्निशमन नियमांबाबत त्रुटी आहेत. त्यामुळे सुधारित नकाशा सादर केल्याशिवाय बांधकाम परवानगी मिळणार नाही. एमएसआयडीसीकडून नकाशा दुरुस्त करून घेत पुन्हा सादर केला जाणार आहे.
Nagpur Legislature Building Plan मनपा अन् प्रिंटिंग प्रेसच्या जागेत अदलाबदल
पूर्वी विधानभवनाच्या विस्तारित इमारतीसाठी शासकीय प्रिंटिंग प्रेसची जागा अधिग्रहित करून अंडरग्राऊंड रस्ता तयार करण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही जागा प्रकल्पातून वगळण्यात आली आहे. त्याऐवजी विधानभवनच्या लगतची मनपाची 22 हजार चौरस फूट पार्किंगची जागा शासनाने अधिग्रहित केली आहे. त्या जागेच्या बदल्यात मनपाला शासकीय प्रिंटिंग प्रेसची जागा दिली जाणार आहे. अर्थात जागेची अदलाबदल करण्यात आली आहे.
Nagpur Legislature Building Plan 662.89 कोटींचा भव्य प्रकल्प
11 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या पायाभूत विकास समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने जीआर जारी केला आहे. त्यानुसार 662.89 कोटी रुपये खर्चून नवे विधानभवन आणि प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.
एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित म्हणाले, राज्य सरकारने विधानभवन विस्तार प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हे बांधकाम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत ईपीसी पद्धतीने केले जाणार आहे.
Nagpur Legislature Building Plan कसे असेल नवे विधानभवन?
एकाच इमारतीत तीन सभागृहे : नवीन इमारतीत विधानसभा, विधानपरिषद आणि सेंट्रल हॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक मजल्यावर एक सभागृह असेल.
जुनी इमारतीचे जतन : सध्या ज्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह आहे, त्याचा उपयोग पुढे मीटिंग हॉल आणि अन्य बैठकींसाठी केला जाणार आहे. सध्याच्या विधानभवनाच्या हेरिटेज संरचनेचे पूर्ण संरक्षण केले जाणार आहे.
भूमिगत पार्किंग : सध्या बेरेक आणि फूड कोर्ट असलेल्या जागेवर नवे विधानभवन उभारले जाणार आहे. वाहनतळाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भूमिगत पार्किंगची व्यवस्था केली जाईल.
Nagpur Legislature Building Plan पुढील 100 वर्षांचे नियोजन : प्रस्तावित परिसीमनाचा विचार करून विधानसभेची आसन क्षमता निश्चित केली जाईल. इमारत पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल आणि एकाही झाडाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.