दीक्षाभूमी चित्र वादावरून काँग्रेसविरोधात निषेध

    दिनांक :28-May-2026
Total Views |
नागपूर,
Dikshabhumi Image Controversy ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या चित्राशी छेडछाड केल्याच्या निषेधार्थ नागपूर शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगेश वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२६ रोजी नागपुरात युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा आणि इतर सहप्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 
Nagpur
 
पत्रकार परिषदेदरम्यान पदाधिकाऱ्यांच्या हातातील पत्रकावर ऐतिहासिक दीक्षाभूमी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. Dikshabhumi Image Controversy मात्र, त्या चित्रात दीक्षाभूमीच्या शिखरावर भगवा ध्वज दर्शविण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. दीक्षाभूमी हे कोट्यवधी नागरिकांच्या श्रद्धेचे, समतेचे आणि बौद्ध धम्माचे पवित्र प्रतीक असून तिच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड करणे म्हणजे ऐतिहासिक वास्तूचे विकृतीकरण असल्याचे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. या प्रकारामुळे समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोपही करण्यात आला.
  
हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला की निष्काळजीपणामुळे घडला, याची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. Dikshabhumi Image Controversyयावेळी शहराध्यक्ष मंगेश वानखेडे, राहुल दहीकर, मनोज सुटे, किशोर घोटे, विजय पाटील, हरिदास गवळी, विनोद मोहोड, तोसीफ शेख, हरीश नानवरे, वनमालाताई उके, पपीताबाई खोबरागडे, प्रतिभा घोटे, रजनी पिल्लेवान, लक्ष्मीकांत मेश्राम, राजू मेश्राम, तेलंग साहेब, विजय गोंडले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र