तुझं वजन का वाढले शस्त्रक्रिया कर...

    दिनांक :28-May-2026
Total Views |
पुणे
domestic violence case शहरातील कॅम्प परिसरातून एक संतापजनक आणि धक्कादायक कौटुंबिक छळाची घटना समोर आली असून, विवाहित महिलेवर तिच्या वजनावरून अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या महिलेचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याची तक्रार तिने पोलिसांकडे दाखल केली आहे. या प्रकरणात पतीसह सासू, नणंद आणि इतर एका सदस्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 

domestic violence case  
 
 
तक्रारीनुसार, सप्टेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत पीडितेचा सातत्याने छळ करण्यात आला. तिचे वजन जास्त असल्याचे कारण देत सासरच्यांनी तिला सतत टोमणे मारणे, अपमान करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू ठेवले. इतकेच नव्हे तर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. या शस्त्रक्रियेचा खर्च माहेरून आणण्यास सांगितल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित महिलेने केलेल्या domestic violence case आरोपांनुसार, तिला अनेकदा घरात कोंडून ठेवण्यात आले आणि अन्न-पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. पतीने तिला वेळोवेळी मारहाण व शिवीगाळ केल्याचा तसेच सासू आणि नणंद यांनीही तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करून माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती.अखेर त्रस्त झालेल्या महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित आरोपींविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.