राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर दमदार प्रवास सुरूच

27 व्या दिवशीही कमाई कायम

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई,
Raja Shivaji box office collection अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली असून, प्रदर्शित होऊन चौथा आठवडा सुरू झाला तरीही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरू आहे. नवीन चित्रपटांची गर्दी वाढत असतानाही महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद अद्याप कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, आठवड्यागणिक कमाईत काही प्रमाणात घट होत असल्याचेही नोंदवले जात आहे.
 

Raja Shivaji box office collection, Riteish Deshmukh 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या भव्य ऐतिहासिक चित्रपटाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. महाराष्ट्रासह इतर भागांमध्येही चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रितेश देशमुख यांच्यासह इतर बॉलिवूड कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटाच्या आकर्षणात भर घालत आहेत. त्यामुळे रिलीजच्या चौथ्या आठवड्यात प्रवेश करूनही चित्रपटाच्या शोला प्रेक्षकांची उपस्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे.बॉक्स ऑफिस ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने 27 व्या दिवशी सुमारे 40 लाख रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 52.65 कोटी रुपयांचा दमदार गल्ला जमवला होता. दुसऱ्या आठवड्यात 24 कोटी रुपयांची कमाई झाली, तर तिसऱ्या आठवड्यात 12 कोटी रुपयांची भर पडली. Raja Shivaji box office collection  या सर्व आकड्यांचा विचार करता, चित्रपटाने 27 दिवसांत एकूण 93.30 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
 
 
देशांतर्गत बाजाराबरोबरच ‘राजा शिवाजी’ला परदेशातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या चित्रपटाने आतापर्यंत 4.22 कोटी रुपयांची कमाई केली असून, वर्ल्डवाइड एकूण ग्रॉस कलेक्शन 114.49 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.ऐतिहासिक विषयावर आधारित चित्रपटांना मिळणारा हा प्रतिसाद लक्षवेधी मानला जात असून, ‘राजा शिवाजी’च्या यशस्वी प्रवासामुळे आगामी काळात अशा विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.