-विद्यापीठातर्फे वेळापत्रक जाहीर
नागपूर,
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील पदवी स्तरावरील अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील प्रवेशाचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 साठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून विद्यापीठाच्या निर्देशानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांनी स्वत:च्या स्तरावर प्रवेश पार पाडायचे आहेत. कुलसचिव डॉ. राजू हिवसे व महाविद्यालयीन विकास विभागाचे उपकुलसचिव डॉ. राजेंद्र उतखेडे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
कोणत्या अभ्यासक्रमांसाठी?
Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University हे वेळापत्रक अव्यावसायिक म्हणजेच नॉन-प्रोफेशनल यूजी अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. यात प्रामुख्याने बीए, बीकॉम, बीएस्सी, बीव्होक, बीबीए यांसारख्या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांचा समावेश होतो. इंजिनीअरिंग, फार्मसी, लॉ, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम यात येत नाहीत. त्यांचे प्रवेश सीईटी सेलमार्फत स्वतंत्रपणे होतात.
प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक
-माहिती पुस्तिका व अर्ज वितरण-3 जून 2026 पासून महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज उपलब्ध करून द्यावेत.
-प्रवेश अर्ज स्वीकृती-3 जून ते 20 जून 2026 विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत
-गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्धी-22 जून 2026, महाविद्यालयांनी नोटीस बोर्ड व वेबसाईटवर यादी लावावी.
-गुणवत्ता यादीनुसार प्रवेश-23 जून ते 4 जुलै 2026 यादीतील विद्यार्थ्यांनी विहित शुल्कासह प्रवेश निश्चित करावा.
-प्रतीक्षा यादीतील प्रवेश- 5 जुलै ते 8 जुलै 2026 रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
-समुपदेशन व स्पॉट अॅडमिशन- आवश्यकतेनुसार जागा शिल्लक राहिल्यास महाविद्यालये ही प्रक्रिया राबवू शकतात.
-प्रवेशाची अंतिम मुदत- 3 ऑगस्ट 2026 या तारखेनंतर कोणतेही प्रवेश केले जाणार नाहीत.
महाविद्यालयांसाठी महत्त्वाच्या सूचना
-सर्व संलग्नित महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसारच काटेकोरपणे राबवावी.
-आरक्षण धोरण, गुणवत्ता निकष व विद्यापीठाचे प्रवेश नियम यांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे.
-3 जूनपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका, प्रवेश अर्ज व शुल्क रचना उपलब्ध करून द्यावी.
-गुणवत्ता व प्रतीक्षा यादी पारदर्शक पद्धतीने तयार करून 22 जून रोजी प्रसिद्ध करावी.
-3 ऑगस्ट 2026 ही प्रवेशाची अंतिम तारीख राहील. त्यानंतर विद्यापीठ कोणत्याही प्रवेशाला मान्यता देणार नाही.