नागपूर,
Sakal Hindu Mahila Sanghatana सकल हिंदू महिला संघटनेतर्फे आयोजित समारोपाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमात मुलांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणाने झाली. यानंतर मुलांनी सादर केलेल्या सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाने उपस्थितांकडून विशेष दाद मिळवली. छोट्या बालगोपालांनी “बहीण-भाऊ” या विषयावरील नृत्य सादर करून कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या चैताली खटी यांनी सुंदर भारूड सादर करून मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. तसेच पुरवार काकांनी प्रेरणादायी गोष्ट सांगितली, तर छोट्या अनिकेतनेही आपल्या सुंदर कथाकथनातून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रार्थना घेण्यात आली. Sakal Hindu Mahila Sanghatana त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला पालकांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली.
सौजन्य: कल्पना वारानशिवार, संपर्क मित्र