मुख्यमंत्रीपदाचा सिद्धरामय्यांचा राजीनामा, “राज्याचे हित माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे”

    दिनांक :28-May-2026
Total Views |
बेंगलुरु,
siddaramaiah resigns कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्याच्या हितालाच आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेही त्यांच्या सोबत उपस्थित होते.
 

मुख्यमंत्रीपदाचा सिद्धरामय्यांचा राजीनामा, 
 
 
सिद्धरामय्या यांनी सांगितले की, काँग्रेस हायकमांडकडून राजीनामा देण्याचे निर्देश मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ आपला निर्णय घेतला. “पक्ष नेतृत्वाने सांगितल्यानंतर मी आज अधिकृतपणे राजीनामा सादर केला आहे. राज्यपाल बंगळूरुमध्ये परतल्यानंतर ते संविधानानुसार माझा राजीनामा स्वीकारतील, याची मला पूर्ण खात्री आहे,” असे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. “आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने सरकार स्थापनेची जबाबदारी मला देण्यात आली होती. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही विसरणार नाही,” असे ते म्हणाले.
राज्यपाल सध्या बंगळूरुमध्ये नसल्याने राजीनामा थेट त्यांच्याकडे देता आला नाही, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. राजभवनाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल रात्री उशिरा शहरात परतणार असल्याने त्यांनी राजीनामा राज्यपालांच्या सचिवांकडे सुपूर्द केला आहे.siddaramaiah resigns यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचीही आठवण करून दिली. “मी आधीच स्पष्ट केले होते की, पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास मी कोणतीही अडचण न आणता राजीनामा देईन. परवा हायकमांडने मला निर्देश दिले आणि आज मी तो निर्णय अमलात आणला,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 
 
राजीनाम्यानंतरही काँग्रेसमधील सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा करत त्यांनी पक्षात कोणतीही मतभिन्नता नसल्याचे स्पष्ट केले. “माझ्यासाठी राज्याचे हित आणि जनतेचे कल्याण हेच सर्वांत महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.