सिद्धरामय्या आज राजीनामा देणार, कर्नाटकमध्ये सत्ताबदल निश्चित

    दिनांक :28-May-2026
Total Views |
बेंगळुरू,
Siddaramaiah to Resign Today कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी घडामोड सुरू असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा तीव्र झाली आहे. मात्र याच दरम्यान राज्यपाल थावरचंद गेहलोत बंगळूरमध्ये उपस्थित नसल्याने राजीनाम्याची प्रक्रिया कशी पार पडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यपाल तातडीच्या कामासाठी मुंबईला गेले आहेत.
 
Siddaramaiah to Resign Today
 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) स्पष्ट केले आहे की, राज्यपाल शहरात नसले तरी राजीनाम्याची प्रक्रिया थांबणार नाही. मुख्यमंत्री आपला राजीनामा राजभवनातील सचिव किंवा नियुक्त अधिकाऱ्याकडे सादर करू शकतात आणि तो पुढील प्रक्रियेसाठी वैध मानला जातो. Siddaramaiah to Resign Today राज्यपाल परतल्यानंतर किंवा त्यांच्या मान्यतेनंतर तो अधिकृतपणे स्वीकारला जातो, असे घटनात्मक नियमांमध्ये स्पष्ट आहे.
 
दरम्यान, आज सकाळी १०:३० वाजता सिद्धरामय्या नाश्त्याच्या बैठकीनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. Siddaramaiah to Resign Today या बैठकीस सर्व मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले असून उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे देखील उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीनंतर सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
कर्नाटकमध्ये नेतृत्व बदल निश्चित मानला जात असून डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री म्हणून ३० मे रोजी शपथ घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, राज्यात नवीन मंत्रिमंडळ रचनेबाबतही हालचाली सुरू असून तीन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, लिंगायत आणि अल्पसंख्याक समाजातील नेत्यांचा समावेश होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. Siddaramaiah to Resign Today एकूणच, राज्यपालांच्या अनुपस्थितीतही घटनात्मक प्रक्रियेप्रमाणे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण होणार असून कर्नाटकमध्ये सत्ताबदलाचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.