भंडारा,
storm lashes जिल्ह्यात आज दुपारच्या वेळी आलेल्या चक्रीवादळामुळे भंडारा, मोहाडी आणि लाखनी तालुक्यातील काही गावांमध्ये अतोनात नुकसान झाले. घरावरील कौलारू, टीनाचे छप्पर उडून गेले, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उंबळून पडली. या सर्व गोंधळात तीन जनावरांचा मृत्यू झाला. दुपारी अचानक आलेल्या वादळाने काही करायच्या आतच होत्याचे नव्हते केले.

आज दुपारी एक वाजताच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाखवणारे. मात्र पाऊस न पडता भंडारा तालुक्यातील चिचोली पुनर्वसन, बोरगाव, मोहाडी तालुक्यातील कांद्री आणि लाखनी तालुक्यातील गोठणगाव यासारख्या ठिकाणी वादळाने प्रचंड गोंधळ घातला. यावेळी चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली. चिंचोली येथील अनेक घरावरची कौलारू आणि टिनाचे छपरे वाऱ्याने उडून गेले. गावातील 4 ते 5 विजेचे खांब कोसळून पडले. तर अनेक झाडे मळून पडली. जनावरांचे गोठे पडल्याने 3 जनावारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कांद्री आणि गोठणगाव परिसरातही हेच चित्र पाहायला मिळाले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने काही क्षणातच होत्याचे नव्हते केले.storm lashes या वादळाने अनेकांना बेघर केले. वादळानंतर सावरासावर करताना लोकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोबत ओढविलेल्या संकटाचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
वादळानंतर जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आढावा घेण्यात आला. झालेल्या नुकसानीची माहिती गोळा केली जात असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी तभाला सांगितले.