गडचिरोली,
summer internship at lloyds metal गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (यूआयटी), अडपल्ली येथील प्रथम वर्ष व द्वितीय सत्रातील डिप्लोमा विद्यार्थ्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांमध्ये उन्हाळी इंटर्नशिप व औद्योगिक प्रशिक्षणास सुरुवात केली आहे. दि. 20 मे रोजी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची संधी उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमांतर्गत 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना बोडली येथील लॉयड्स अकॅडमिक स्किल सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आले आहे, तर 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना कोन्सारी व सूरजागड येथील प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण दिले जात आहे. मायनिंग इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थ्यांना विशेषतः सूरजगड मायनिंग प्रकल्पात प्रशिक्षणाची संधी मिळाली असून, खाण उद्योगातील विविध तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अनुभव ते घेत आहेत. इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, औद्योगिक सुरक्षा पद्धती आणि कार्यस्थळ व्यवस्थापन यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जात आहे. अनुभवी अभियंते व उद्योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शैक्षणिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य आत्मसात करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची योग्य व्यवस्था करण्यात आली असून, प्रशिक्षण अधिक प्रभावी व्हावे यासाठी कंपनीकडून स्टायपेंड देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. हा संपूर्ण उपक्रम लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून साकार झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबत रोजगाराभिमुख औद्योगिक अनुभव मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगक्षेत्रातील कौशल्य आत्मसात करावे, यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने यूआयटी अडपल्लीच्या प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य केले असून, शिक्षण व उद्योग यांच्यात मजबूत दुवा निर्माण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.summer internship at lloyds metal विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, रोजगारक्षमता मजबूत करणे आणि त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात सक्षम बनविणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांसह पालक व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, भविष्यातही अशा उद्योग-संलग्न प्रशिक्षण कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.