संजीवरेड्डी बोदकुरवार यांची आदरांजली
वणी,
Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगत्या यज्ञकुंडामध्ये स्वतःसह पूर्ण कुटुंब झोकून देणारे जगातील एकमेव उदाहरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. त्यांची प्रत्येक कृती देशप्रेमाने ओतप्रोत होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सहन करणारे स्वा. सावरकर हे स्वातंत्र्यसंग्रामातील प्रखर देशभक्त होते, असे प्रतिपादन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते येथील सावरकर चौकात आयोजित सावरकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.
Swatantryaveer Savarkar या कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून गजानन कासावार यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद करून या चौकात स्वा. सावरकर यांचे पोर्ट्रेट तयार व्हावे यासाठी सर्वांनी मिळून पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक नवले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला भाजपाचे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, सावरकर जयंती समिती प्रमुख संजय दोरखंडे, सुरेश मोरे, अनिल पोटे, सुनील ठाकरे, एकनाथ मांडवकर, डॉ. अनिरुद्ध वैद्य, संतोष इनमुलवार, डहाळकर, विशाल झाडे, पुरुषोत्तम आक्केवार, रहीम शेख, सोनू शेख, संघाचे विभाग संपर्कप्रमुख प्रशांत भालेराव, नगर सहकार्यवाह कवडू पिंपळकर, विशाल काळे, गजानन कौरासे व अन्य सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.