नसरापूर प्रकरणातील नराधमाचा खेळ खल्लास

फक्त 28 दिवसात झाली आरोप निश्चिती

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई
Nasrapur Case नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आरोपी भीमराव कांबळेचा गेम ओव्हर झाला आहे. आरोपी भीमराव कांबळे याच्यावर आरोपी निश्चित झाले असून फक्त 28 दिवसात पोलिसांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून न्याय मिळवून देण्याता प्रयत्न केला आहे.
 nasarapur case 
Nasrapur Case पीएम रिपोर्ट, अनेक मेडिकल चाचण्या सादर
फार्स्ट ट्रॅक कोर्टात पहिल्यांदाच भीमराव कांबळेला कोर्टात हजर केलं जाणार होतं. पीएम रिपोर्ट, अनेक मेडिकल चाचण्या सादर केल्या गेल्या होत्या. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले, पण अखेर आरोपीच्या वकिलांना कोणताही पुरावा सादर करता आला नाही. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात आरोप निश्चित केले गेले आहेत.
Nasrapur Case इन कॅमेरा सुनावणी होणार
या महत्त्वपूर्ण सुनावणीस विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर, मूळ तक्रारदाराचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि तपास अधिकारी न्यायालयात हजर होते. आता खटल्याची रोज सुनावणी होणार असून इन कॅमेरा सुनावणी होणार आहे. पोलिसांकडून फक्त 15 दिवसात चार्टशीट दाखल करण्यात आली होती. चार्टशीटवर सुनावणी पार पडली आहे.
दरम्यान, आरोपी भीमराव कांबळे याच्यावर नवीन कायद्यानुसार म्हणजेच ‘भारतीय न्याय संहिता , 2023’ च्या कलम 103(1), 64, 65(2), 74, 137(2), 140(1) आणि ‘पोक्सो’ (पाँक्सो अलीं, 2012) कायद्याच्या कलम 4, 6, 8 व 12 अन्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत.