चंद्रपूर,
tigress killed बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर बुधवारी मध्यरात्री आणखी एका वाघिणीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील लोंखैरी बीटमधील कक्ष क्रमांक 247 मध्ये ही घटना घडली. या मार्गावरील हा आतापर्यंतचा 19 वा वाघ मृत्यू आहे.
वन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, 27 मेच्या मध्यरात्री ही वाघीण रेल्वेमार्ग ओलांडत असताना भरधाव रेल्वेगाडीची धडक बसली. घटनास्थळ सिंदेवाही परिक्षेत्रातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या हद्दीत असून, वाघिणीचा मृत्यू जागीच झाला. दरम्यान, वन्यजीव कार्यकर्ते आणि ‘रोडकिल्स इंडिया’चे मिलिंद परिकवाम यांनी, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर टीका केली आहे. या रेल्वेमार्गावर यापूर्वीही अनेक वाघ, बिबट आणि अन्य वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहेत.tigress killed वन्यजीवांच्या स्थलांतर मार्गांवर वेगमर्यादा, सेन्सर प्रणाली, अंडरपास आणि सतर्कता यंत्रणा उभारण्याची मागणी वारंवार होत असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.