त्या 'वाघिणी'चे दुसरे पिल्लू पकडले

    दिनांक :28-May-2026
Total Views |
 चंद्रपूर, 
tigresss second cub सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे वाघिण आणि तिच्या बछड्यांनी चार महिलांच्या ठार केले होते. त्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. तिच्या पिल्लांनाही पकडण्याची परवानगी मिळाली आणि त्यातील एका पिलाला सोमवारी पकडण्यात आले होते. उर्वरित पिलांचा शोध सुरू असताना गुरुवार, 28 मे रोजी वाघिणीचे दुसरे पिल्लू पकडण्यात वनविभागाला यश आले आहे.
 
 
tigresss second cub
 
 
अन्य पिल्ल्याचा शोध वनविभाग घेत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीटातील कक्ष क्रमांक 286 मध्ये डॉ. रविकांत खोब्रागडे आणि शूटर अजय मराठे यांनी दुसर्‍या पिल्ल्याला गुंगीची औषध इंजेक्शन देऊन पिंजर्‍यात बंद केले. यावेळी वनविभागाचे गुरुनानक ढोरे, योगेश लाडे, प्रफुल्ल वाटगुरे, दिपेश टेंभुर्णे, वशिम शेख, विकास ताजने, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आदी उपस्थित होते. यापूर्वी, शनिवारी पवनपार परिसरातील एका तलावाजवळ वाघीण टी-2 ला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते.