वेळ बदलला, शासनाचा मेसेज तोच

    दिनांक :28-May-2026
Total Views |
वर्धा,
governments message गेल्या तीन दिवसांपासून शासनाच्या वतीने पुन्हा पासून सावध रहा असा एकाच वेळी शेकडो लोकांना मेसेज येतो आहे पहिल्या दिवशी अनेकांना मेसेज कशाचा याची भीती वाटली. काहींनी तो फ्रॉड असू शकतो असेही वक्तव्य केले. गेल्या दोन दिवसांपासून अडीच वाजताच्या सुमारास येणारा अलर्ट मेसेज आज साडेबारा वाजता च्या सुमारास धडकला.
 
 
governments message
 
गेल्या दोन दिवसापासून येणारे या अलर्ट मेसेज मध्ये दुपारची ऊन आणि रात्रीची उष्ण हवा सांगण्यात आलेली आहे. गेल्या दोन दिवसात रात्रीची उष्ण हवा वर्धा जिल्ह्यामध्ये कुठेही अनुभवता आलेली नाही. governments message उष्णतामानही आधी होते तसेच आहे. असा अलर्ट मेसेज येणार आहे असा मेसेज आधी सरकारच्या वतीने द्यायला पाहिजे होतं अशी चर्चा चहा टपरीवर सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे अचानक घेणाऱ्या या मेसेजने काही वेळ संभ्रम तयार झालेला असतो.