दुचाकी चोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

    दिनांक :28-May-2026
Total Views |
चार दुचाक्या जप्त : डीबी पथकाची कारवाई

यवतमाळ,
Two-wheeler thief शहर डीबी पथकाने शहरातील चार मोटारसायकल चोरी प्रकरणांचा छडा लावत अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची सुमारे 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. चांदोरेनगरातील संजय ठवळे यांनी बुधवार, 27 मे रोजी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांची एमएच27 एस8381 ही हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल विश्वशांतीनगर परिसरातील पिंपळगाव बायपास रोडवरून चोरीला गेली होती.
 
 
y28May-Duchaki
 
Two-wheeler thief  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हा लक्षात घेऊन ठाणेदारांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयिताने पारस अपार्टमेंट परिसरात चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मनोज भास्कर देमनगुंडे (वय 41, पिंपळगाव, यवतमाळ) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीकडून ठवळे यांच्या दुचाकीसह आणखी तीन दुचाक्या जप्त करण्यात आल्या. यात टीव्हीएस अपाचे, फॅशन प्रो आणि टीव्हीएस एनटॉर्क या वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बसने आणि ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. डीबी पथकाचे गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, पवन नांदकर, पवन तडसे, प्रदीप कुरडकर आणि मयूर तेलंगवार यांनी कारवाई पार पाडली.