उमरखेडला कामकाजावर बहिष्कार
उमरखेड,
Umarkhed Municipal Council उमरखेड नगर पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय जनता पार्टीचे गटनेते व अन्य नऊ नगरसेवकांनी नपा कार्यालयावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत मंगळवार, 26 मे रोजी जिल्हाधिकाèयांना निवेदन दिले. यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवेदनात नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जानेवारी 2026 पासून सत्ताधाèयांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध प्रभागांतील नागरिकांच्या अनेक तक्रारी लेखी स्वरूपात नपा अध्यक्ष व मुख्याधिकाèयांकडे सादर करण्यात आल्या. मात्र आजपर्यंत कोणत्याही तक्रारीवर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना केराची टोपली दाखविल्याची भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण, ‘ओपन स्पेस’वरील बेकायदेशीर बांधकामे, विस्कळित पाणीपुरवठा, निष्क्रिय आरोग्य विभाग, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता न होणे, बंद पडलेले पथदिवे, मोकाट कुत्र्यांचा त्रास, गतिरोधकांची मागणी, नपाच्या निविदांमधील रखडलेली कामे, नळ जोडणीमध्ये अतिरिक्त शुल्क आकारणी अशा विविध विषयांचा निवेदनात उल्लेख आहे. तसेच अहिल्यादेवी उद्यानामधील झाडे पाण्याअभावी सुकल्याचा मुद्दा, मच्छीमार बांधवांसाठी सुरक्षित जागेची मागणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंच बसविण्याची मागणी आणि व्यंकटेशनगरमधील नाली काम प्रलंबित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Umarkhed Municipal Council भाजपा नगरसेवकांच्या मते, त्यांच्या प्रभागातील विकासकामांनाही जाणीवपूर्वक दुय्यम वागणूक दिली जात असून प्रशासन पक्षपातीपणे काम करत आहे. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत नगर पालिका कार्यालयावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, तक्रारींचे निराकरण न झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. नगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते विजय हरडपकर, भास्कर साधू, करुणा कुबडे, गोपाळ कलाने, वंदना घाडगे, सुरेंद्र कोडगिरवार, ज्योत्स्ना रुडे, खुशबू मेंढे, अॅड. विजय गुजरे, अमोल तिवरंगकर यांनी जिल्हाधिकाèयांना हे निवेदन दिले आहे .