-नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
-नागपुरात रुजविणार खेळ संस्कृती
- शहरातील चारही दिशांना क्रीडासंकुल प्रस्तावित
नागपूर,
नागपुरातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरात खेळ संस्कृती रुजण्यासाठी चारही दिशांना क्रीडासंकुल प्रस्तावित असून, खेळांच्या दृष्टीने शहर देशात सर्वोत्तम बनविण्यात येईल, अशी ग्वाही Union Minister Nitin Gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आठव्या खासदार क्रीडा महोत्सवाला 31 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यानिमित्त गुरुवार, 28 मे रोजी सेंटर पॉईंट, रामदासपेठ येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच पुण्याचे खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, शहरातील प्रत्येक तरुण सुदृढ राहावा, शहरातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा, यासाठी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
Union Minister Nitin Gadkari नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे 25 जलतरण तलाव तयार करण्याचा मानस असून, खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळेल अशी क्रीडासंकुले तयार केली जातील. यशवंत स्टेडियम येथून रन मॅराथॉन रनने खासदार महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या मॅराथॉनचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेता सुनील शेट्टी करणार असून मॅराथॉनमध्ये जवळपास 30 ते 35 हजार स्पर्धक धावतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी केले. मंचावर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशचे महासचिव संजय शेटे, उपाध्यक्ष मनोज भोरे, स्मिता यादव उपस्थित होते.
महोत्सवात यंदा मर्यादित खेळ प्रकार
आचारसंहिता असल्याने क्रीडा महोत्सव 18 खेळ प्रकारांपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षी 65 खेळांचा क्रीडा महोत्सव होईल, असे आश्वासन क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी दिले.
लकी ड्रॉचे आकर्षण
‘रन नागपूर रन’मध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, प्रमाणपत्र व स्नॅक्स दिले जाणार आहे. याशिवाय लकी ड्रॉद्वारे प्रथम बक्षीस बजाज चेतक, द्वितीय बक्षीस ईव्ही-मोटारसायकल, तृतीय बक्षीस ईव्ही-सायकल, चौथे ते सहावे बक्षीस स्पोर्ट्स सायकल, 7 वे ते 10वे बक्षीस स्पोर्ट्स शूज जिंकण्याची संधी आहे. सर्वात कमी व सर्वाधिक वयाच्या खेळाडूंना व परिवाराला विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. टी-शर्ट व चेस नंबरचे वाटप 29 व 30 मे रोजी सकाळी 11 ते 5 दरम्यान यशवंत स्टेडियम येथे होणार आहे. पत्रपरिषदेला आ. संदीप जोशी यांच्यासह डॉ. पीयूष आंबुलकर, डॉ. संभाजी भोसले, सचिन देशमुख, डॉ. विवेक अवसरे, डॉ. पद्माकर चारमोडे, अश्फाक शेख, आशिष मुकीम उपस्थित होते.