IPLमध्ये वैभवची तुफानी दहशत; सिक्सरांच्या पावसात गेलचा विक्रम चूर!

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई,
IPL आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या तुफानी फलंदाजीमुळे चर्चेत आहे. या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला असून, त्याने ख्रिस गेलचा ऐतिहासिक विक्रमही मोडला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आणखी एक शानदार खेळी साकारली. तो शतकापासून अवघ्या तीन धावा दूर राहिला, मात्र या खेळीदरम्यान त्याने आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला. वैभवने यंदाच्या हंगामात आतापर्यंत १५ सामन्यांत तब्बल ६५ षटकार ठोकले आहेत. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने एका हंगामात ५९ षटकार मारले होते.
 
IPL 2026
 
राजस्थान रॉयल्सचा संघ क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला असल्याने वैभवकडे हा विक्रम आणखी भक्कम करण्याची संधी आहे. त्याची स्फोटक फलंदाजी पाहता तो पुढे किती मोठा विक्रम प्रस्थापित करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा आहे. IPL त्याने १५ सामन्यांत ४३ षटकार मारले आहेत. मात्र हैदराबादचा स्पर्धेतील प्रवास संपल्याने त्याच्या षटकारांची संख्या आता वाढणार नाही. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रजत पाटीदार असून त्याच्या नावावर १४ सामन्यांत ४१ षटकार आहेत. आरसीबी अंतिम फेरीत पोहोचल्याने त्याला अजून एक संधी मिळणार आहे.
  
दरम्यान, चौकारांच्या बाबतीत गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन अव्वल स्थानी आहे. त्याने १५ सामन्यांत ६५ चौकार लगावले आहेत. विराट कोहली ६४ चौकारांसह दुसऱ्या स्थानावर असून इशान किशनच्या नावावर ६० चौकार आहेत. IPL षटकारांच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशी सध्या सर्वांच्या खूप पुढे गेला असून, यंदाच्या आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी विशेष आकर्षण ठरत आहे.