धनकुबेराला वेतनाची गरजच काय!

मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी पगार घेतलेला नाही

    दिनांक :28-May-2026
Total Views |
मुंबई
Mukesh Ambani रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग सहाव्या वर्षी कंपनीकडून कोणताही पगार घेतलेला नाही. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत त्यांना रिलायन्सकडून कोणताही पगार, भत्ते, विशेष लाभ, सेवानिवृत्ती लाभ, कमिशन किंवा स्टॉक ऑप्शन्स मिळालेले नाहीत.
 
mukesh ambani
Mukesh Ambani रिलायन्सच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 महामारीच्या काळात देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुकेश अंबानी यांनी जून 2020 मध्ये आपला संपूर्ण पगार न घेण्याचा निर्णय घेतला. कंपनीने म्हटले आहे की, हा निर्णय पूर्णपणे स्वेच्छेने घेतला होता आणि त्यावर ते ठाम आहेत.
 
Mukesh Ambani  विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजने आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक नफा नोंदवला. आर्थिक वर्ष 2025-26 साठी कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 95,754 कोटी होता. वर्षाच्या अखेरीस, रिलायन्सचे बाजार भांडवल 18,19,103 कोटी किंवा 191.8 अब्ज होते. असे असूनही, मुकेश अंबानी पगार न घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
कोविडच्या आधीही, मुकेश अंबानी यांनी आपल्या पगाराबाबत सावध भूमिका घेतली होती. आर्थिक वर्ष 2008-09 पासून, त्यांनी आपला एकूण वार्षिक पगार 15 कोटींपर्यंत मर्यादित ठेवला होता. रिलायन्सच्या व्यवसायात आणि नफ्यात लक्षणीय वाढ होऊनही, ही मर्यादा 12 वर्षे कायम होती.
 
 
Mukesh Ambani कॉर्पोरेट जगात, उच्चपदस्थ अधिकाèयांच्या पगारासंदर्भात भागधारक आणि प्रशासनाशी संबंधित प्रश्न अनेकदा उपस्थित झाले आहे. अशा परिस्थितीत, मुकेश अंबानींचा सलग सहा वर्षे शून्य पगार घेण्याचा निर्णय एक अद्वितीय उदाहरण म्हणून पाहिला जात आहे.