पाणीपुरवठा व स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार
1 जूनपासून आंदोलन छेडणार
मारेगाव,
Work stoppage movement महाराष्ट्र राज्य गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने पंचायत समिती अंतर्गत कार्यरत गटसंसाधन केंद्रातील (बीआरसी) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर राज्य सरकारला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हे निवेदन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले. याबाबत पाणी व स्वच्छता तालुका गट समन्वयक गौतम चौरे यांनी पंचायत समिती मारेगावचे सहायक गटविकास अधिकारी हेमराज राठोड यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात राज्यातील पंचायत समिती अंतर्गत पाणी व स्वच्छता विभागात कार्यरत गट समन्वयक व समूह समन्वयक कर्मचारी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियान तसेच जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हे कर्मचारी सातत्याने कार्यरत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Work stoppage movement मारेगाव तालुक्यात गटसमन्वयक, इंजिनीअर, ऑपरेटर असे तीन पदे असून मात्र डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीचे, तब्बल पाच महिन्यांचे मानधन अद्याप मिळाले नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. मे महिनाही संपत आल्याने एकूण सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने कर्मचाèयांवर आर्थिक संकट ओढावले आहे. घरखर्च, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याची व्यथा कर्मचाèयांनी निवेदनातून मांडली आहे.