दिल्लीच्या रस्त्यांवर संशयाची छाया; मुखर्जी नगरमध्ये मोठी कारवाई

    दिनांक :29-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Mukherjee Nagar दिल्लीतील मुखर्जी नगर परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हे नागरिक भारतात राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. मुखर्जी नगर पोलीस स्थानिक पातळीवर बेकायदेशीर स्थलांतरित आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवत होते. याच मोहिमेदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सुरुवातीला दोन संशयितांच्या हालचालींवर स्थानिक नागरिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हे दोघे सतत बंगाली भाषेत बोलत असल्याचेही निदर्शनास आले होते.
 
Mukherjee Nagar
 
या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. चौकशीत उघड झाले की हे दोघेच नव्हे तर आणखी तीन जण मिळून एकूण पाच जण मुखर्जी नगर परिसरातील इंदिरा विकास कॉलनीतील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. तपासात हे सर्वजण बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत असेही समोर आले की हे पाचही जण वेगवेगळ्या कालावधीत बांगलादेशातून भारतात आले होते. Mukherjee Nagar सुरुवातीला ते दिल्लीतील विविध हॉटेल्समध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांनी इंदिरा विकास कॉलनीमध्ये वास्तव्य सुरू ठेवले. ते सर्वजण रोजगाराच्या शोधात युरोपमध्ये जाण्याच्या उद्देशाने येथे थांबले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
 
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या नागरिकांना पश्चिम बंगालमधील मालदा टाऊन येथील एका व्यक्तीच्या मदतीने दिल्लीतील मुखर्जी नगरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्यांचा व्हिसा कालावधी संपल्यानंतरही ते बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्यास होते, हे स्पष्ट झाले आहे. Mukherjee Nagar या कारवाईनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व पाचही बांगलादेशी नागरिकांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.