नागपूर,
Ahilyadevi Holkar Jayanti दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मात्र, सध्याची परिस्थिती तसेच नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून यावर्षी रॅली न काढता जयंतीचा मुख्य कार्यक्रम कार्यालयातच आयोजित करण्यात आला आहे.
तरी सर्व समाज बांधवांना सूचित करण्यात येते की, रविवार दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता आयोजित जयंती कार्यक्रमास उपस्थित राहावे. समाजातील सर्व बांधवांची उपस्थिती आवश्यक असून नागपूर जिल्ह्यातील विविध संघटनांचे अध्यक्ष, सचिव तसेच पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहावे, Ahilyadevi Holkar Jayanti अशी विनंती आयोजकांनी केली आहे. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
धनगर युवक मंडळ, नागपूरतर्फे अध्यक्ष रमेश पाटील व सचिव गणेश पावडे यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ, Ahilyadevi Holkar Jayanti नागपूरच्या अध्यक्षा हर्षा पाटील व सचिव वैशाली भुजाडे यांनीही सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
स्थळ : स्वाती अपार्टमेंट, वेणू कॉर्नर, मानेवाडा रोड, नागपूर.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र