लाखो विद्यार्थ्यांची चिंता वाढली; CBSE पोर्टल अद्याप बंद

    दिनांक :29-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
CBSE Portal Still Down सीबीएसई १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. आजपासून सुरू होण्याची अपेक्षा असलेले पुनर्मूल्यांकन पोर्टल अद्याप सुरू झालेले नसून, आता ते १ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्टल अधिक सुरक्षित आणि त्रुटीमुक्त ठेवण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातील परीक्षा आणि मूल्यमापन प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असताना, सीबीएसईही कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिक सतर्क झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पुनर्मूल्यांकन प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.
 
CBSE Portal Still Down
 
यावर्षी ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी १२वीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. १ जूनपासून प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, लखनौ उच्च न्यायालयात सीबीएसईच्या ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. CBSE Portal Still Down घाईघाईने लागू करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
 
ज्या विद्यार्थ्यांना गुणांची बेरीज, उत्तरपत्रिका तपासणी किंवा गुणांकन प्रक्रियेबाबत शंका आहे, त्यांना अर्जाची संधी मिळणार आहे. ज्यांनी आधीच आपल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रती मागवल्या आहेत, ते पुनर्मूल्यांकनासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘पोस्ट रिजल्ट सर्व्हिसेस’ किंवा ‘व्हेरिफिकेशन अँड री-इव्हॅल्युएशन’ विभागात लॉगिन करावे लागेल. CBSE Portal Still Down त्यासाठी रोल नंबर आणि अॅडमिट कार्ड आयडी आवश्यक असेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन किंवा दोन्हीपैकी पर्याय निवडता येतील. पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित प्रश्न क्रमांक निवडून ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
 
गुण पडताळणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार असून, प्रत्येक प्रश्नाच्या पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, जर विद्यार्थ्याचे गुण वाढले तर मंडळाकडून संपूर्ण शुल्क परत केले जाईल. मात्र, तपासणीनंतर गुण कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. CBSE Portal Still Down सीबीएसईकडून आता १ जूनपासून पोर्टल सुरू करण्याचे नियोजन केले जात असून, लाखो विद्यार्थी या प्रक्रियेची प्रतीक्षा करत आहेत.