तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची चमक

    दिनांक :29-May-2026
Total Views |
गडचिरोली, 
Archery Competition गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धा 2026 मध्ये लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अकॅडमीचा गौरव वाढविला आहे. देशभरातील विविध राज्यांतील प्रतिभावान तिरंदाजांच्या उपस्थितीत झालेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले. 24 ते 31 मे या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत सर्व गटांसाठी 18 मीटर अंतरावर सामने घेण्यात आले. स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रतिनिधित्व करताना दिया बॅनर्जी हिने 21 वर्षांखालील गटात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तिने उत्कृष्ट एकाग्रता, सातत्य आणि अचूक नेमबाजीचे प्रदर्शन करत अव्वल स्थान मिळविले.
 
 
Archery Competition
 
Archery Competition  तर 18 वर्षांखालील गटात आदित्य नायगमकर याने उल्लेखनीय खेळ करत रौप्यपदक जिंकले. बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना त्याने आत्मविश्‍वासपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत दुसरे स्थान प्राप्त केले. ही स्पर्धा गोवा अ‍ॅमॅच्युअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. तसेच भारतीय तिरंदाजी संघटना आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाची या स्पर्धेला मान्यता होती. लॉयड्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण तसेच अकॅडमीतील दर्जेदार प्रशिक्षण, कठोर मेहनत आणि युवा खेळाडू घडविण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या यशाबद्दल प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.