वर्धा,
BJP Training Class भारतीय जनता पार्टी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ओळखले जाते. कार्यकर्त्यांची पक्षसोबत बांधिलकी असावी आणि संघटनेविषयी प्रशिक्षित असावा यासाठी देशभर प्रशिक्षणाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात १९ मंडळातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याचा एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यवतमाळ येथील दीनदयाल प्रबोधिनीमध्ये करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्ह्याचे अध्यक्ष संजय गाते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार दादाराव केचे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये भाजपाचे वैचारिक अधिष्ठान, कार्य विस्तार, भाजपाचा इतिहास व विकास, बूथ प्रबंधन, मन की बात व सोशल मीडिया, देशासमोरील राजकीय व सामाजिक आव्हानं, विचार परिवार, कार्यकर्ता विकास, आपल्या सरकारची कामगिरी आदी विषयावर दिनेश सूर्यवंशी, शिवराय कुलकर्णी, माजी आमदार अनिल सोले, संजय फांजे, किरण पातुरकर, अविनाश देव संजय गाते आमदार संजय भेंडे, जयंत देहनकर, धर्मपाल मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले. समारोेपिय कार्यक्रमात आ. सुमित वानखेडे, आ. समीर कुणावार प्रामुख्याने उपस्थित होते.
BJP Training Class प्रशिक्षणाचा समारोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. द्वि दिवशीय निवासी प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा समाजामध्ये काम करताना अधिक उत्तम रीतीने समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत सरकारी योजना पोचवून भाजपा अधिक मजबूत करेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी व्यत केला. याचवेळी मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आगामी कार्यक्रमाची माहिती देणारी कार्यशाळा पार पडली. यामध्ये पर्यावरण दिन, जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय योग दिन व आणीबाणी एक काळा दिवस या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली यशस्वीतेकरिता महामंत्री कमलाकर निंभोरकर, श्रीधर देशमुख, अर्चना वानखेडे, अशोक कलोडे, आकाश पोहाणे, निलेश पोहेकर, राहुल करंडे, दिनेश डकरे, वैभव राऊत, शिव डकरे आदींनी परिश्रम घेतले.