अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime news वाडी परिसरातील एका बंद घरात एका वृद्ध दाम्पत्यांचा मृतदेह आढळला. ही घटना शुक्रवारी सकाळी समाेर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्या वृद्ध दाम्पत्यांचा खून कि आत्महत्या याबाबत संशय निर्माण झाला आहे. मात्र, पाेलिसांनी या प्रकरणात हत्याकांडाचा संशय फेटाळला आहे. गंगाधर जानबाजी भाेंगाडे (75) आणि काैशल्याबाई गंगाधर भाेंगाडे (72) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, गंगाधर भाेंगाडे हे आयुध निर्माणी (डिेन्स) मध्ये नाेकरीवर हाेते. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नी काैशल्यासह राहत हाेते. त्यांना दाेन विवाहित मुली आहेत. गेल्या काही दिवासांपासून वृद्ध दाम्पत्य आजारी हाेते. काैशल्या यांनी बेडवरुन उठणे शक्य नव्हते, त्यामुळे गंगाधर त्यांचा आधार हाेते. पत्नीला जेवण भरवणे आणि अन्य कामे ते करीत हाेते. शुक्रवारी सकाळी त्यांची मुलगी पतीसह माहेरी आली असता त्यांना घरात आई बेडवर मृतावस्थेत तर वडिल बाथरुमसमाेर मृतावस्थेत दिसले. त्यांनी लगेच नातेवाईक आणि पाेलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाडी पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने पाेलिसांनी विविध अंगांनी तपास केला. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
........
वृद्धांचा आधार हरपताेय
वृद्ध दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत हाेते. दाेन्ही विवाहित मुली आपापल्या संसारात मग्न हाेत्या. आईवडिलांची प्रकृती ठिक नसतानाही त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कुणी नव्हते.nagpur crime news गंगाधर हे पाय घसरुन पडल्याने बेशुद्ध झाले असावे तर पत्नी काैशल्या यांचा भूकेने तडफडून मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. या घटनेवरुन वृद्धांचा आधार हरवत असल्यामुळे अनेक वृद्धांना एकाकी जीवन जगण्याची वेळ आली आहे.
.....