मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक पॉवर ब्लॉक

    दिनांक :29-May-2026
Total Views |
सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग
आजपासून काही गाड्या रद्द तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट

नागपूर,
Electronic Interlocking at Sevagram Railway Station मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक पॉवर ब्लॉक ३० मे ते ६ जून दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे. सेवाग्राम विभागामध्ये तिसरी व लाईनच्या कामाअंतर्गत सेवाग्राम स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली उपलब्ध करून देणे तसेच यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत खालील गाड्यांवर परिणाम होणार असून ६ जून रोजी रद्द राहणार्‍या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ६११०९ वर्धा तेनागपूर मेमू गाडी, तर गाडी क्रमांक ६१११० नागपूर ते—वर्धा मेमू रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२२१९ अमरावती ते अजनी एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक १२१२० अजनी ते अमरावती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
 
 
sevagram
 
याशिवाय, गाडी क्रमांक हावडा ते—छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस तसेच गाडी क्रमांक ६१११० नागपूर ते वर्धा मेमूचा सेवाग्राम स्थानकावरील थांबा (स्टॉपेज) ३० मे ते ६ जून रद्द राहील. तसेच, नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ बंद असल्यामुळे कोचिंग परिचालनावरील परिणामाचा कालावधी ५२ दिवसांवरून ६१ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता ३० मे ते ७ जून पर्यंत अतिरिक्त ९ दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.
 
Electronic Interlocking at Sevagram Railway Station  शॉर्ट टर्मिनेशन गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ११२०३ नागपूर ते—मडगाव एक्सप्रेस, जी नागपूरहून दुपारी १५.०५ सुटते, ती दिनांक ३० मे ते ६ जून पर्यंत अजनी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. याशिवाय शॉर्ट ओरिजिनेशनमध्ये गाडी क्रमांक ११२०४ मडगाव ते नागपूर एक्सप्रेस, जी नागपूरला रात्री २१.३० वाजता पोहोचते, ती दिनांक ३१ मे ते ७ जून पर्यंत अजनी स्थानकावरून ओरिजिनेट करण्यात येईल.