मोझरी ( शेकापूर),
Farm barn on fire शेतातील गोठ्याला आग लागल्यामुळे संतोष वाघमारे यांचे कृषी साहित्य , वैरण जळून खाक झाले. यात शेतकर्याचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे समजते. ही घटना आज २९ रोजी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कानगाव शिवारात वाघमारे यांचे गावालगत शेत आहे. दुपारी रखरखत्या उन्हात शेतातील गोठ्याला अचानक आग लागली.
Farm barn on fire वारा वाहत असल्यामुळे काही एक कळण्यापूर्वीच गोठ्यातील कडबा, कुटार, शेतीची अवजारे आणि सिंचनाचे पाईप्स जळून खाक झाले. संतोष वाघमारे यांचेकडे खोल्हापूर शिवारात चार एकर शेती आहे. शेतात विहीर असून सोलर पंपद्वारे ओलितांची शेती करतात. शेतात विटा सिमेंटने मजबूत बांधलेले गोठा असून तेथे वैरण आणि शेतीच्या मशागतीचे सर्व साहित्य, उपकरणे, यासह इतर सामान ठेवले होते. दुपारी त्या गोठ्याला आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले. या वृत्त लिहिल्या जाईपर्यंत आग धुमसतच होती.