वृक्ष वाढीला गट्टूचा खोडा

गट्टू काढण्यासाठी वैद्यकीय जनजागृती मंचची मागणी

    दिनांक :29-May-2026
Total Views |
वर्धा,
medical awareness forum शहरातील अनेक वृक्षांच्या खोडा भोवती कुठलीही पाण्यासाठी जागा न सोडता आलेले गट्टू कालांतराने झाडांच्या वाढीस अडथळा निर्माण करीत आहेत. काही ठिकाणी गट्टूंनी खोडाला घट्ट आवळल्यामुळे वृक्षांच्या नैसर्गिक वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे वैद्यकीय जनजागृती मंचच्या निदर्शनास आले. नगर पालिका प्रशासनाने झाडांभोवती असलेले गट्टू काढा अशी मागणी वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
medical awareness forum
 
 
वैद्यकीय मंचाच्या सदस्यांनी शहरातील काही वृक्षांवरील अशा गट्टूंचे प्रत्यक्ष निरीक्षण करून ते काढण्याचा उपक्रम राबविला. त्यानंतर शहरातील सर्व वृक्षांवरील वाढीस अडथळा ठरणारे गट्टू तातडीने हटविण्यात यावे या मागणीसाठी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच मुख्याधिकारी विजय देशमुख यांना निवेदन देण्यात आले.medical awareness forum निवेदनाची दखल घेत नगर परिषद अध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य मान्य केले. वृक्षांच्या खोडाला हानी पोहोचविणारे गट्टू शय तितया लवकर हटविण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यत केली आहे. आपल्या परिसरातील वृक्षांवर अशा प्रकारचे गट्टू वाढीस अडथळा ठरत आढळल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी व भविष्यात ते लावताना काळजी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले आहे.