अगा हे अजबच झाले... रात्रीच दिवे लागले!

    दिनांक :29-May-2026
Total Views |
सेलू, 
Ghorad Power Supply घोराड परिसरात गुरुवारी अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकले तर विद्युत तारा तुटल्या. वीज वितरणच्या कर्मचार्‍यांनी मेहनत घेऊन घोराडकरांची रात्र मात्र सुकर केली. एरवी असे वादळ उठले की वीज वितरण कंपनी ग्राहकांना रात्रभर अंधारात ठेवणार असा शिका मारला गेला असताना रात्रीच वीज पुरवठा सुरळीत झाल्याने वीज वितरण कंपनीने अगा हे अजबच केले... असे वाटू लागले आहे.
 
 
Power Supply
 
Ghorad Power Supply  गुरुवारी दुपारी अवघे तीन मिनिट आलेल्या वादळाने गावातील वीज तारांवर झाडं कोसळली. वादळ एवढे भयानक होते की होत्याचे नव्हते करून ठेवले. त्यामुळे अनेक ठिकाणी लोखंडाचे विद्युत पोल वाकले. विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे रात्र अंधारात जाणार, असे ग्रामस्थांना वाटत होते. रात्री काहीही केले तरी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही, हे सर्वांनाच वाटत होते. पण, घोराड येथील वीज वितरण अभियंतांनी लगेच अतिरिक्त कर्मचारी पाचारण करीत गावात फेरफटका मारला. परिस्थिती पाहली. तारांवर पडलेली झाडे दूर केली अन् कर्मचार्‍यांना कामाला लावत अभियंत्यांनी स्वत: तळ ठोकत रात्री ८ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात त्यांच्या चमूला यश आले. रात्री ९ चे सुमारास गावात लख्ख प्रकाश पडला अन् गावकर्‍यांना रात्र अंधारात जाण्याची मनात असणारी भीती दूर केली. वादळ झाले वादळाने झालेले नुकसान समोर दिसत होते. पाहता पाहता सूर्य मावळत होता अन् गावात एकच चर्चा सुरू झाली रात्रभर लाईन येणार नाही. पण, वीज कर्मचार्‍यांनी काही होईल तरी रात्र अंधारात जाऊ देणार नाही असा जणू निर्धार करीत काम केले.