आजनसरा,
gadkaris 69th birthday संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ना. नितीन गडकरी यांचा वाढदिवस संत भोजाजी महाराज देवस्थान प्रांगणात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संत्रानगरी नागपुरात ना. गडकरी यांची वस्त्र तुला करण्यात आली तर संतनगरी आजनसरा येथे ना. गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भक्तांना पांढरे दुप्पटे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूरचे संयोजक प्रमुख व संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसराचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांच्या प्रेरणेतूनच हा कार्यक्रम सेवेच्या रूपाने साकारला गेला. उन्हातून येणार्या भक्तांना मायेची सावली मिळावी म्हणून पांढरा दुपट्टा पांघरून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सीव्हो ब्लड बँक नागपूर आणि श्री साईनाथ ब्लड बँक यांच्या माध्यमातून रतदान शिबिर घेण्यात आले. ना. गडकरी यांचा ६९ वा वाढदिवस असल्याने ६९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून कार्यक्रमाला अर्थपूर्ण बनवले. ना. गडकरी यांनी १२ एप्रिल रोजी आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानच्या वार्षिक पुण्यतिथी सोहळ्याला भेट देऊन महापूजा केली होती. त्यावेळी वर्धा-यवतमाळ जिल्ह्यांना जोडणार्या रोहिणी घाटावरील पुलाचे भूमिपूजन, सिरसगाव-निधा-टाकळी आजनसरा- पोहणा मार्गाच्या नवनिर्माणासाठी आणि वडनेर-आजनसरा चौरस्त्यावर फ्लाय ओव्हरला केंद्रीय निधीतून मंजुरी देण्यात आली होती.gadkaris 69th birthday ना. गडकरी यांच्या विकास कामांवर डॉ. पर्बत यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी संत भोजाजी ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान मार्गदर्शक कृष्णाजी पर्बत, अध्यक्ष गंगाधर कोल्हे, सचिव सुधाकर डेकाटे उपाध्यक्ष जनार्धन जवंजाळ, हिंगणघाट शहरा अध्यक्ष कमलाकर ठाकरे, शहरसचिव गणपत गाडेकर, व्यवस्थाप्रमुख रमेश पुसदेकर, धर्माजी काळे, रामकृष्णा कोपरकर, विश्वनाथ रेवतकर, पंढरी उमाटे, विजय जगताप, मोहन गंडाईत, दिवाकर खडसे, शामराव टापरे, गणेश सोनोने,प्रसिद्धी प्रमुख डॉ. संदीप लोंढे, संत भोजाजी विश्वस्त मंडळाचे सचिव शिवदास पर्बत, उपाध्यक्ष धनराज मेश्राम, राजेंद्र ढवळे, नामदेव गाढवे, रमेश ठाकरे, रामाजी कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर, शालिनी ईखार बंडुजी शंभरकर, दिनेश कलवडे, संजय पुसदेकर, कैलास पाटील, अविनाश जवंजाळ, देवस्थान कर्मचारी मारुती वैरागडे, रोशन धनाडे यांनी सहकार्य केले.